शिर्डी -शिर्डी ग्रामस्थ व भाविकांच्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दर गुरूवारची साईबाबांची पालखी मिरवणूक पुन्हा साई संस्थानकडुन सुरू करण्यात आली ( Shirdi Sai baba Palkhi ) आहे. त्यामुळे साईभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
साईबाबांच्या पालखी मिरवणुकीला जवळपास 108 वर्षांची परंपरा आहे. साईबाबांच्या काळात द्वारकामाई मंदिर ते चावडी मंदिरापर्यंत ही मिरवणूक दिवसाआड काढण्यात येत असे. बाबांच्या निर्वाणानंतर दर गुरूवारी पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली. ठराविक सण व उत्सवात पालखी किंवा रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. गुरुवारी साईबाबांच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.