महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लोकांना पर्याय हवाय, तो विविध पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्र येत देऊ शकतात'

झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येत सरकार स्थापन केले. यातून आपल्याला प्रेरणा मिळाली असल्याचे म्हटले होते, याचाही उल्लेख शरद पवार यांनी केला.

sharad pawar
शरद पवार

By

Published : Jan 2, 2020, 5:35 PM IST

अहमदनगर - देशातील जनतेला सद्या केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारला पर्याय हवा आहे. मात्र, तो पर्याय कोणताही एक पक्ष देऊ शकत नसल्याने, देशातील इतर विविध पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्रित येवून तो पर्याय देऊ शकतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राने दिलेला पर्याय देश पातळीवर इतरही पक्षांना अपेक्षित असल्याचा उल्लेख पवारांनी यावेळी केला.

देशातील अन्य पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्र येत केंद्र सरकारला पर्याय देऊ शकतात... शरद पवार

हेही वाचा... 'देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनीच माझे तिकीट कापले'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात समान ध्येयधोरणावर विविध पक्षांनी एकत्र येत दिलेला पर्याय प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते, याचा उल्लेख केला. तसेच देशातही जनतेला पर्याय हवा आहे, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर एकत्र येत देशातही तसा पर्याय जनतेला अपेक्षित आहे, कारण सध्याच्या परिस्थितीत कोणता एक पक्ष दुसरा पर्याय म्हणून समर्थ ठरू शकत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील आपणास एक पत्र पाठवून पर्याय देऊ शकणाऱ्या पक्षांच्या एकत्रित बैठकीचे सुचवले असल्याची माहिती, शरद पवार यांनी यावेळी दिली. शरद पवार हे आज गुरूवारी अहमदनगर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा... 'डी.पी. त्रिपाठी हे उत्तम राजकारणी होते'

ABOUT THE AUTHOR

...view details