महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आताची परिस्थिती भाजपच्या 'नालायक'पणामुळे - विजय वडेट्टीवार - Vijay Wadettiwar shirdi bjp criticize

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्टपती राजवटीचा मुद्दा काढणे म्हणजे पोरखेळच आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी केला. परिस्थितीनुसार राष्ट्रपती राजवट येईल, भाजपने सरकार स्थापन केले नाही, म्हणजे लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे होत नाही. अति शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न मुनगंटीवारांनी केला आहे.

आताची परिस्थिती भाजपच्या 'नालायक'पणामुळे - विजय वडेट्टीवार

By

Published : Nov 2, 2019, 5:11 PM IST

अहमदनगर - जनतेने सरकार स्थापनेचा जनादेश भाजप-शिवसेनेला दिला आहे. निकाल लागून इतके दिवस होऊन त्यांनी सरकार स्थापन केले नाही. आताच्या ही भाजपच्या नालायकपणामुळे निर्माण झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. जिल्ह्यातील शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच युतीचे ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर त्यांनी सरकार स्थापन करायला पाहिजे. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी भाजपकडून सत्तास्थापनेला उशिर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आताची परिस्थिती भाजपच्या 'नालायक'पणामुळे - विजय वडेट्टीवार

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्टपती राजवटीचा मुद्दा काढणे म्हणजे पोरखेळच आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी केला. परिस्थितीनुसार राष्ट्रपती राजवट येईल, भाजपने सरकार स्थापन केले नाही, म्हणजे लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे होत नाही. अति शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न मुनगंटीवारांनी केला आहे.

हेही वाचा -शिवसेनेने बहुमताच्या ठरावावेळी फारकत घ्यावी, तरच काँग्रेस पुढचा विचार करणार - नितीन राऊत

आता जनतेने त्यांना संधी दिली आहे. त्यांनी सरकार स्थापनेचा निर्णय घ्यावा, अन्यथा बाजूला व्हा. शिवसेनेने स्पष्ट भूमिका स्वीकारावी. भाजप-सेनेने एकदा स्पष्ट निर्णय घेतल्यानंतरच आम्ही आमची भूमिका घेऊ, असेही त्यांनी सांगितले. तसेच आमचे नेते सोमवार पासून राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतील आणि नवनिर्वाचित सरकारसमोर मांडू, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा -आज जे सुरुय तो तर पोरखेळ आहे - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details