अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाने कहर घातला असतानाच दुसरीकडे मात्र, राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी या गावात अद्यापही कोरोनाचा शिरकाव झालेले नाही. मुळा धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे अलग थलग पडलेल्या या वावरथ जांभळी गावात कोरोनाचा अद्याप शिरकावच झालेला नसल्याचे गावचे सरपंच तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
लोक वस्तीवर विभागून राहतात-
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळा नदीवर 26 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या मुळा धरणाच्या पाणी फुगवट्यामुळे काही गावे पुर्नवसीत करावी लागली आहे. तर वावरथ, जांबुळबन आणि जांभळी या गावाचा रस्ते मार्गाचा तालुक्याच गाव असलेल्या राहुरीशी संपर्क तुटला गेला आहे. या गावातील सर्व नागरिकांनाचे सर्व व्यवहार शासकीय कामासाठी, होडीने प्रवास करुन राहुरीत जावे लागते. त्यामुळे अनेक अडचणीशी सामना या लोकांना करावा लागतो. मात्र दुसरीकडे तीन गावे मिळून साडे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पोहोचणे अवघड आहे. या गावातील लोक वाड्या वस्तीवर जास्त राहत असल्याने या कोरोनाच्या काळात फदेशीरही ठरत आहे. सध्या गावातून बाहेर फारशे लोक जात येत नाही. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांपासून होणारा संसर्ग टळता येत आहे. तर लोक वस्तीवर विभागून राहत असल्याने आणी त्यातही पुरेशी काळजी घेतली जात असल्याने मागील आणि या लाटेत येथे कोरोना शिकराव झाला नसल्याचे, गावातील नागरिक सांगत आहे.