अहमदनगर -जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी आता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. येत्या वटपौर्णिमेपासून जिल्ह्यात 'एक व्यक्ती एक झाड अभियान' राबविले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. या अभियानासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. या माध्यमातून नगर परिषद, नगरपंचायत हद्दीत लोकसहभागातून सहा लाख 70 हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. येत्या वटपौर्मिमेच्या दिवशी वडाचे रोप लावून या अभियानाची सुरुवात होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
'प्रदुषणाला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची'