अहमदनगर - मुंबईतील घाटकोपरहून गावाकडे परतणाऱ्या ३० वर्षीय पोलीस पत्नीची अहमदनगरमध्ये तपासणी करण्यात आली. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेले सात अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यामध्ये ही महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, इतर सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
'ती' पोलीस पत्नी कोरोनाबाधित, मुंबईहून गावी परतताना अहमदनगरमध्ये झाली तपासणी - अहमदनगर लेटेस्ट न्युज
संबंधित महिला आणि तिचा पती हे मुंबईत घाटकोपर येथे राहतात. तो घाटकोपर येथे पोलीस कॉन्स्टेबल आहे. त्यांना त्यांच्या मूळ गावी परतायचे होते. मात्र, तिथेच तिला त्रास जाणवत होता. तरीही ते गावाला जायला निघाले. मात्र, तिला प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णायात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली.
संबंधित महिला आणि तिचा पती हे मुंबईत घाटकोपर येथे राहतात. तो घाटकोपर येथे पोलीस कॉन्स्टेबल आहे. त्यांना त्यांच्या मूळ गावी परतायचे होते. मात्र, तिथेच तिला त्रास जाणवत होता. तरीही ते गावाला जायला निघाले. मात्र, तिला प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णायात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिला सर्दी, ताप आणि खोकला होता. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तत्काळ तिच्या घशातील स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. मात्र, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तो मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
यापूर्वीही बाहेर जिल्ह्यातून आलेली व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. यापूर्वी बाधित आढळलेला तो रुग्ण आष्टी (जि. बीड) येथील होता. त्याच्यावर अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालय आणि बूथ रुग्णालयामध्ये उपचार केले होते.