अहमदनगर (संगमनेर) - जेजुरीला देवदर्शनासाठी जात असताना टेम्पोला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील माळवाडी शिवारात आज सोमवार (दि. 14 मार्च) पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident in Jejury Road) हे सर्व जण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील राहणार आहेत.
सर्वजण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील राहणारे आहेत
वैभव योगेश गिरी चालक वय वर्षे (२५) आकाश दत्ता खोडे वय वर्षे (२१ ), पुजा दत्तात्रय खोडे वय वर्षे (२३), प्रिया शरद आंबेकर वय वर्षे (२३), चेतन गणेश शिंदे वय वर्षे ( १०), ताराबाई दत्तात्रय खोडे वय वर्षे (३५ ), जनाबाई पुंडलिक खोडे वय वर्षे (६५) हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील राहणारे आहेत. हे नाशिक येथून जेजुरीला देवदर्शनासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते.
उपचारा दरम्यान झाला मृत्यू
सोमवारी पहाटे संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारातील माळवाडी येथे आले असता त्याच दरम्यान त्यांच्या छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला. अपघात झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या सर्व जखमींना टेम्पोतून बाहेर काढले. त्यानंतर औषधोपचारासाठी माऊली अॅक्सिडेंट हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, औषध उपचार दरम्यान जनाबाई पुंडलिक खोडे यांचा मृत्यू झाला आहे. तर, वरील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.