महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जामखेड-नगर रोडवर अपघात; कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू - अहमदनगर अपघात

विशाल काकासाहेब पवार (वय ३० रा. पोलीस स्टेशनजवळ, जामखेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून पवन गायकवाड व अभिमन्यू उगले हे दोघे यात गंभीर जखमी झाले आहेत.

accident
जामखेड-नगर रोडवर अपघात

By

Published : Dec 27, 2019, 12:20 PM IST

अहमदनगर- जामखेड - नगर महामार्गावरील आष्टी तालुक्यातील (जि. बीड) पोखरीजवळ भीषण अपघात झाला. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या शेजारील झाडावर आदळून खड्ड्यात पडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा -एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ

विशाल काकासाहेब पवार (वय ३० रा. पोलीस स्टेशनजवळ, जामखेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून पवन गायकवाड व अभिमन्यू उगले हे दोघे यात गंभीर जखमी झाले आहेत. आज (शुक्रवार) पहाटे हा अपघात झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे. आकाश पवार हे जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत साहेबराव आबा पवार यांचे नातू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details