अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील तळेगांव चौफूलीपासून काही अंतरावर असलेल्या विडी कारखान्याजवळ आज उसाचा ट्रक पलटी होवून अपघात झाला. या अपघातामध्ये एका निवृत्त बस कंडक्टरचा (वाहक) मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. भिमराज यशवंत दिघे (वय - ७३) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रकखाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अहमदनगरमध्ये उसाचा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू - संगमनेर
संगमनेर तालुक्यातील तळेगांव चौफूलीपासून काही अंतरावर असलेल्या विडी कारखान्याजवळ आज उसाचा ट्रक पलटी होवून अपघात झाला. या अपघातामध्ये एका निवृत्त बस कंडक्टरचा (वाहक) मृत्यू झाला आहे.
सेवानिवृत्त भिमराज दिघे नेहमीप्रमाणे रस्ता ओलांडून बिडी कारखान्याजवळील कचरा कुंडीत कचरा टाकण्यासाठी जात होते. त्यावेळी लोणीहून उसाने भरलेला ट्रक (एमएच-१२- एमव्ही- ९५१३) रस्त्याने भरधाव वेगात येत पलटी झाला. यामध्ये भिमराज दिघे ट्रकखाली दबले गेले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे तळेगांव दिघे गावामध्ये शोककळा पसरली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.