अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा असून यामध्ये तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या १४ दिवसानंतरच्या दुसऱ्या अहवालाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. कोरोना विषाणू बाधित तिसऱ्या रुग्णाचा चौदाव्या दिवसाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
अहमदनगरच्या तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह, १२२ व्यक्तींच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा - अहमदनगर कोरोना न्यूज
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
दरम्यान, आज अखेरपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १००२ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे तर दुसरा बाधित रुग्ण हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील असून तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. एकूण ८४८ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. अद्याप १२२ स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. ०७ स्त्राव अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आहेत. जिल्हा रुग्णालयात १५३ जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ५६१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.