अहमदनगर- ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिर्डीजवळील राहाता शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी घेवून जात आरोपी अनिल किसन थोरात याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या हाताला हिसका देवून पळाल्याने मुलगी बचावली. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपी ताब्यात
ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या मूकबधिर आणि अपंग आई तसेच आजीसोबत राहाता येथे राहते आहे. तिच्या एका मैत्रिणीमुळे आरोपी अनिल थोरात आणि तिची ओळख झाली. २१ जुलैला आरोपीने गोड बोलून दोघींनाही शहरातील एका हॉटेलात जेवायला नेले. जेवण झाल्यानंतर दोघींनाही त्याने घरी सोडले. मात्र दुसऱ्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी ही तीच्या घरी एकटीच असताना, दुपारच्या सुमारास आरोपी थोरात हा तीच्या घरी गेला. त्याने मुलीला धमकावत तिला मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलीला घेवून तो एका निर्जनस्थळी गेला. त्याठिकाणी त्याने मुलीचा हात पकडत मला तू आवडतेस असे म्हणत त्याने तीच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.