अहमदनगर -हिंदू धर्मात पवित्र असलेल्या श्रावण मासातील आज तिसरा सोमवार आहे. त्यानिमित्त शिवभक्त शहराजवळ असलेल्या लष्करी हद्दीतील श्री बेलेश्वर हे श्रीस्थळ मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून गर्दी करीत आहेत.
श्रावणी सोमवारनिमित्त बेलेश्वर मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी - श्रावण मास
शिवभक्त श्रावण मासात शंकराची मनोभावे पूजा करतात. त्यातही तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे शिवभक्तांना एक पर्वणीच असते. याच पर्वणीचा मुहूर्त साधत आज शिवभक्त ठिकठिकाणी शिवलिंगाच्या दर्शनासाठी मंदिरात भल्या पहाटेपासून गर्दी करत आहेत.

श्रावणी सोमवारनिमित्त बेलेश्वर मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी
श्रावणी सोमवारनिमित्त बेलेश्वर मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी
शिवभक्त श्रावण मासात शंकराची मनोभावे पूजा करतात. त्यातही तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे शिवभक्तांना एक पर्वणीच असते. याच पर्वणीचा मुहूर्त साधत आज शिवभक्त ठिकठिकाणी शिवलिंगाच्या दर्शनासाठी मंदिरात भल्या पहाटेपासून गर्दी करत आहेत. श्री बेलेश्वर शिभक्तांच्या नवसाला पावत असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात. तसेच आज रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी शिवभक्तांची मोठी मांदियाळी असणार आहे.
Last Updated : Aug 19, 2019, 10:16 AM IST