शिर्डी :श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात 1911 मध्ये साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली होती. तेंव्हापासून शिर्डीत दरवर्षी राम नवमी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने बुधवार दिनांक 29 मार्च रोजी पहाटे 5.15 वा साईबाबांची काकड आरती, पहाटे 5.45 वाजता साईंच्या प्रतिमेची व पोथीची मिरवणूक, 6 वा व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण 6.20 वा. साईबाबांचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 7 वा. साईंची पाद्यपुजा, दुपारी 12.30 वाजता आरती, प्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी 4 वा. ते सायं. 6 यावेळेत समाधी मंदिरा शेजारी कीर्तन होणार आहे. सायंकाळी 6.30 वा.धुपारती होईल. रात्रौ 7.15 ते 9.30 या वेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्रौ 9.45 वा. चावडीत साईबाबांची पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ 10.30 वा. शेजारती होईल. यादिवशी पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.
गुरुवार, दिनांक 30 मार्च रोजी पहाटे 5.15 वा. साईबाबांची काकड आरती, पहाटे 5.45 वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून साईंची प्रतिमेची व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी 6.20 वा. कावडींची मिरवणूक व साईंचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी 7 वा. साईंची पाद्यपुजा, सकाळी 10 ते 12 यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रम, दुपारी 12.30 वा. माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी 4 वा. निशाणांची मिरवणूक तर सायं. 5 वा. साईंची रथाची गावातून मिरवणूक होणार आहे.
मिरवणूक परत आल्यानंतर सायं. 6.30 वा. धुपारती होईल. रात्रौ 7.15 ते 8.15 या वेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्रौ 9.15 वा. साईंची गुरुवारची नित्याची पालखी मिरवणूक होईल. रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कलाकार कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवा देणार आहेत. हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे समाधी मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे. त्यामुळे 30 मार्च रोजीची रोजची शेजारती आणि 31 मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.