महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम - Ahmednagar Police

महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त अहमदगर शहर व जिल्हा पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान करताना पोलीस
रक्तदान करताना पोलीस

By

Published : Jan 9, 2020, 10:07 AM IST

Updated : Jan 9, 2020, 11:26 AM IST

अहमदनगर- महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी करण्यात आली आहे. या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे कार्यक्रम 2 जानेवारी ते 8 जानेवारी अशा 'रेझिंग डे' सप्ताहामध्ये साजरे करण्यात येतात.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम


यंदा अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. 9 जाने.) अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..

Last Updated : Jan 9, 2020, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details