अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दोन अपघात झाले. यातील डोळासणे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक ट्रक रसत्यावरच उलटल्याने महामार्गा वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पुणे-नाशिक महामार्गावर दोन अपघात; एक ठार - Ravindra Mahale
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दोन अपघात झाले. एका अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात ट्रक रसत्यावरच उलटला.
सोनजांब (जि. नाशिक) येथील एक दुचाकीस्वार नाशिककडून पुण्याकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्यांच्या चेहऱ्यासह कंबरेवरील भागाचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. समाधान विनायक बागुल (रा. हनुमान नगर, सोनजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांचा जागीच मुत्यू झाला आहे.
दुसरीकडे याच महामार्गावरील कर्जुले शिवारात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नाशिककडे मालट्रकचा (एम एच ४१ बी ५२२३) टायर फुटल्याने मालट्रक रास्तावरच आडवा झाला. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कर्जुले पठार ते गुंजाळवाडी फाटा दरम्यान सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलीस व डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तासापासून सर्व्हिस रोडवरून सुरू आहे.