महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sailakshmi Yadnya : साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन...108 जोडप्यांना यजमान पदाचा मान... - साईबाबांचा चाहता वर्ग मोठा

साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्र्स्ट शिर्डी यांच्या वतीने साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात शिर्डी येथे करण्यात आलं आहे. देशात आणि जगात सुखशांती नांदावी, तसेच सुजलाम सुफलाम पर्जन्यमान राहावं, यासाठी गेल्या 23 वर्षापासून या यज्ञाचं आयोजन करण्यात येत आहे.

Sailakshmi Yadnya
साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन

By

Published : Jan 15, 2023, 7:31 PM IST

प्रतिक्रिया देतांना साईलक्ष्मी यज्ञाचे आयोजक

अहमदनगर/शिर्डी :मकर संक्रातीच्या पर्वावर साईबाबांच्या शिर्डीत नवविद्या भक्तीचे प्रतिक म्हणून महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. देशात आणि जगात सुखशांती नांदावी, तसेच सुजलाम सुफलाम पर्जन्यमान राहावं, यासाठी गेल्या 23 वर्षापासून साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्र्स्ट शिर्डी यांच्या वतीने साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात येतं.

साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन



विदेशातील भाविक सहभागी : यंदाचा वर्षी 108 यजमान या यज्ञासाठी बसले असून; साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्र्स्ट शिर्डी यांच्या वतीन दरवर्षी मकर संक्रातीला हे आयोजन केले जाते. साईबाबांनी आपल्या अंतिम समयी तत्कालीन भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविद्या भक्ती म्हणून नऊ नाणे दिली होती. याच भक्तीच्या माध्यमातून हा यज्ञ केला जातो. पौराहित्य करत यज्ञ प्रज्वलीत करुन आहोती दिली जाते. महत्वाचं म्हणजे या यंज्ञाला देशातूनच नव्हे तर, विदेशातील देखिल भाविक सहभागी होतात.

साईलक्ष्मी यज्ञाचं आयोजन


108 यजमान बसणार यज्ञाला : गेल्या 23 वर्षा पासुन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्र्स्ट शिर्डी यांच्या वतीने शिर्डीत साईलक्ष्मी यज्ञाच आयोजन करण्यात येते. मागील वर्षी कोरोना महामारी मुळे यज्ञण्यासाठी भाविकांना येता आले नसल्याने, यज्ञ ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला होता. मात्र आता सगळे सुरळीत सुरू झाल्याने यंदा भाविकांना या यज्ञसाठी शिर्डीत येता आले आहे. आज देशातूनच नव्हे तर, विदेशातून देखील भाविक या यज्ञासाठी शिर्डीत दाखल झाले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल 108 यजमान या यज्ञासाठी बसले असल्याची माहिती, आयोजक अरुण गायकवाड यांनी दिली आहे.

साईबाबांचा चाहता वर्ग मोठा : शिर्डीतील साईबाबांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिण भारतातील भाविक देखील साईंना प्रचंड मानतात, त्यांची उपासना करतात. हे लक्षात घेता शिर्डी येथे प्रत्येक सणाचे औचित्य साधुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. दरवर्षी लाखो भाविक साई बाबांचे दर्शन घेतात. येथे भाविकांसाठी भव्य प्रसादाची सोय केलेली असते. भाविकांनी दिलेले गुप्तदान अथवा दान हे संस्थानच्या वतीने विविध सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणले जाते.

हेही वाचा : Sai Baba : भक्ताकडून साईबाबांच्या चरणी तब्बल 27 लाखांची सोन्‍याची आरती

ABOUT THE AUTHOR

...view details