महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरमध्ये डाळिंब पिकावर आता 'तेल्या'चे सावट, शेतकरी अडचणीत

राहाता तालुक्यात शेतीतील डाळिंब फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या वादळी वाऱ्यापासून वाचलेल्या डाळिंब फळाला आता तेल्या म्हणजेच 'ऑइली स्पॉट' हा रोग होत असल्याने राहाता तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

डाळींब उत्पादक शेतकरी
डाळींब उत्पादक शेतकरी

By

Published : Jun 7, 2020, 5:27 PM IST

अहमदनगर - आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही डाळिंबाची फुले आणि छोटी फळे गळून पडल्याने मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता तेल्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे.

काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी राहाता तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीतील डाळिंब फळे गळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या वादळी वाऱ्यापासून वाचलेल्या डाळिंब फळाला आता तेल्या म्हणजेच 'ऑइली स्पॉट' हा रोग होत असल्याने राहाता तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

राहाता तालुक्यात साधारणत: 10 ते 11 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये डाळिंब शेतीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यात आधी शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. त्यात झाडावरील अनेक फुले आणि फळे गळून पडली. त्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होईल. त्यात आता फळावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यात फळाला चिर पडते; त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या पिकाचे तेल्या रोगापासून संरक्षण करावे लागणार आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने यावर्षी उन्हाळ्यात बागांना ताण जाणवला नाही. मात्र, सध्या झालेल्या वादळ आणि तेल्यामुळे डाळिंबाचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या दुहेरी संकटातून सावरण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details