महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रमजाननिमित्त जामा मशिदीवर विद्युत रोषणाईतून फडकतोय तिरंगा

शिर्डी जवळील राहाता शहरातील जामा मशिदेवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

रमजाननिमित्त जामा मशिदीवर विद्युत रोषणाईतून फडकतोय तिरंगा

By

Published : Jun 4, 2019, 9:25 PM IST

अहमदनगर - यंदा पवित्र रमजान ईद साजरा करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी शिर्डी जवळील राहाता शहरातील जामा मशिदेवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईचे वैशिष्ट्य म्हणजे या रोषणाईमधून भारताचा राष्ट्रध्वज फडकताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या माध्यमातून मुस्लीम बांधवांनी दिला आहे.

रमजाननिमित्त जामा मशिदीवर विद्युत रोषणाईतून फडकतोय तिरंगा

देशात विविध धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. या सण उत्सवाच्या माध्यमातूनच भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन नेहमीच घडत असते. त्याप्रमाणेच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईद हा सण देखील दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details