अहमदनगर - कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे एका किर्तनातील वक्तव्यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेले वक्तव्य 'पीसीपीएनडिटी अॅक्ट'नुसार (प्रसूतिपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायदा) अपराध आहे. त्यामुळे, अहमदनगरच्या पीसीपीएनडिटी सल्लागार समितीने त्यांच्याविरोधात नोटीस काढली आहे.
'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य त्यांनी एका कीर्तनात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंदोरीकर महारांजावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते.