अहमदनगर- जामखेड तालुक्यातील बहुरुपवाडी हे जवळपास 150 बहुरुपींचे वास्तव्य असलेले गाव आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी हे बहुरुपी कधी पोलीस, कधी डॉक्टर, तर कधी वकीलाच्या पोशाखात वावरत असतात. सतत भटकंती करणाऱ्या या समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. भटक्या विमुक्त जमातीत येणाऱ्या या समाजाचा विचार सरकारने करावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी जामखेड बहुरुपी संघटना कार्यरत आहे.
बहुरुपींच्या मुलांना शासकीय सेवेत समाविष्ट करा; बहुरुपवाडीची मागणी
जामखेडमधील बहुरुपवाडीतील बहुरुपी समाजाने सरकारने त्यांच्या मुलांना सरकारी नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे. तसेच यासाठी त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनंती केली आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
याच समाजातील साहेबराव चव्हाण यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे. तसेच सरकारी नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे. यापूर्वी त्यांनी ही मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. आता थोरात सत्तेत असल्याने ते या समाजाचे प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा चव्हाण यांनी वर्तवली आहे.