महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत पावसाची दडी; पिके करपू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती - शेतकरी

आज राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी मोठ्या आडचनीत सापडले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेरणी इतका पाउस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दांडी मारल्याने पिके जळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतकरी

By

Published : Jul 31, 2019, 8:14 AM IST

अहमदनगर- वरुण राजाने पाठ फिरविल्याने शिर्डीतील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला बरसणारा पाऊस यंदा तब्बल एक महिना उशिरा आला त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या उगवलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याचा मार्गावर आहे.

शिर्डीतील पाऊस परिस्थितीची आढावा देताना 'ईटिव्ही भारत' चे प्रतिनिधी रवींद्र महाले

सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेरणी इतका पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, जवारी, मका, सोयाबिनची पेरणी केली. मात्र, आज २० दिवस उलटूनही पाऊस न आल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक अक्षरश: जळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसाने ओढ दिल्याने शिर्डी विमानतळ लगत असलेल्या मल्हार वाडी शिवारातील अनेक शेतकाऱ्यांची पिके जळाल्याची पहायला मिळत आहे. त्याचबरोबर या भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच पाऊस न पडल्यास शेतातील राहिलेले पिकही जळून जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details