अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायत समितीच्या एकूण 17 जागांचे निकाल लागले असून त्यात आमदार निलेश लंकेच्या नेतृत्वाखाली (Local body Election 2022) राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहेत. (Results of Nagar Panchayat in Ahmednagar district) शिवसेनेला 6 जागा तर भाजपला एक जागा मिळाली आहे. दोन प्रभागात शहर विकास आघाडीचे तर एक ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. (Local body Election results) सत्तेसाठी 9 जागा जिंकणे गरजेचे असल्याने हा जादुई आकडा राष्ट्रवादी वा शिवसेनेला गाठता आला नाही. त्यामुळे शहर विकास आघाडीने दोन जागा जिंकल्याने सत्तेची चावी त्यांच्या हातात गेली आहे.
प्रभागवार विजयी उमेदवार-
- प्रभाग 1 :- ठाणगे कांतीलाल शालुबाई :- शिवसेना
- प्रभाग 2 :- सुप्रिया सुभाष शिंदे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 3 :- योगेश अशोक मते :- अपक्ष
- प्रभाग 4 :- नवनाथ तुकाराम सोबले :- शिवसेना
- प्रभाग 5 :- नितीन रमेश अडसूळ :- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत
- प्रभाग 6 :- निता विजय औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 7 :- विद्या अनिल गंधाडे :- शिवसेना
- प्रभाग 8 :- भूषण उत्तम शेलार :- पारनेर शहर विकास आघाडी
- प्रभाग 9 :- हिमानी रामजी नगरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 10 :- सुरेखा अर्जुन भालेकर :- पारनेर शहर विकास आघाडी
- प्रभाग 11:- अशोक फुलाजी चेडे :- भाजपा
- प्रभाग 12 :- विद्या बाळासाहेब कावरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 13 :- विजय सदाशिव औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 14 :- निता देवराम ठुबे :- शिवसेना
- प्रभाग 15 :- जायदा राजू शेख :- शिवसेना
- प्रभाग 16 :- युवराज कुंडलिक पठारे :- शिवसेना