अहमदनगर- माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादला जात असताना नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. दरम्यान शनिवारी सकाळी याच विश्रामगृहावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मात्र, त्यांच्या टिकेवर बोलण्याचे फडणवीस यांनी टाळले.
बाळासाहेब थोरातांच्या 'त्या' टीकेवर फडणवीस यांचे मौन..! - देवेंद्र फडणवीस
फडणवीस यांचे सर्व अंदाज चुकत असल्याने त्यांनी आता नवीन भविष्यवाला शोधावा, अशी टीका थोरातांनी आज (शनिवारी) सकाळीच केली होती. त्या टीकेचा ते समाचार घेतील, अशी शक्यता असताना फडणवीसांनी मात्र माध्यमांशी न बोलताच औरंगाबादकडे प्रयाण केले.
फडणवीस यांचे सर्व अंदाज चुकत असल्याने त्यांनी आता नवीन भविष्यवाला शोधावा, अशी टीका थोरातांनी आज (शनिवारी) सकाळीच केली होती. त्या टीकेचा ते समाचार घेतील अशी शक्यता असताना फडणवीसांनी मात्र माध्यमांशी न बोलताच औरंगाबादकडे प्रयाण केले.
भारतीय जनता पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी मुलाखती झाल्या होत्या. मात्र जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जिल्हाध्यक्षपद निवडीचा चेंडू प्रदेशच्या कोर्टात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, विश्रामगृहात आल्यानंतर फडणवीस थोरात यांनी केलेली टीका आणि जिल्हाध्यक्ष निवडणूक याबाबत काही सूचक विधान करतील, असे माध्यमांसह भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु फडणवीस यांनी सूचक मौन पाळले.