शिर्डी:समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज (Nivruti Maharaj Indorikar) यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा विश्राम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांचे ३० मेपर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द (program canceled till May 30) करण्यात आले आहेत. इंदोरीकरांचे किर्तन ऐकणाऱ्याची आणि कार्यक्रम ठेवलेल्यांचा या बातमीमुळे हिरमोड झाला आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकरांचे कार्यक्रम 30 मे पर्यंत रद्द - program canceled till May 30
समाज प्रबोधनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले निवृत्ती महाराज इंदोरीकर (Nivruti Maharaj Indorikar) यांचे ३० मेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द (program canceled till May 30) करण्यात आले आहेत. याबाबत त्यांनी एक पत्रक काढून माहिती दिली आहे.
इंदोरीकर
इंदोरीकरांचे महाराष्ट्रभर किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. पण इच्छा असूनही ते कार्यक्रमास येऊ शकत नसल्याने आयोजकांची मोठी गैरसोय झाली आहे. यासंबंधी इंदोरीकरांनी दिलगीरी व्यक्त केली असून त्याबाबत पत्रक जारी केले आहे. दरम्यान वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रुजू होणार आहे आपले प्रेम व आशिर्वाद सदैव पाठीशी लाभावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.