अहमदनगर - मुलगा अनंतचा गुरूवारी तर पती मुकेश यांचा आज शुक्रवारी वाढदिवस असल्याने नीता अंबानी साईचरणी नतमस्तक झाल्या आहेत. दिल्लीत फिरोजशाह कोटला मैदानावर गुरुवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपीटल्समध्ये आयपीएल सामना सुरू असतानाच नीता अंबानी यांनी शिर्डीत येऊन संघाच्या यशासाठीही साईबाबांना साकडे घातले होते.
मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी नीता अंबानी साईचरणी; सामना जिंकेपर्यंत मंदिरातच - ipl
दिल्लीत सुरू असलेल्या सामन्यावरही यावेळी त्यांचे लक्ष होते. आरतीनंतर सामन्याचे पारडे बदलले.
नीता अंबानी यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिर्डीत आगमन झाले. नेमकी त्याच वेळी साईबाबांची धुपआरती सुरू झाली. त्यावर नीता अंबानी यांनी हेलीपॅडवर गाडीतच थांबून आपल्या मोबाईलवर साईबाबांची मंदिरातील आरती ऑनलाईन पाहिली. यानंतर दिल्लीत मॅच सुरू होत असताना बरोबर ८ वाजता समाधी मंदिरात येऊन संघाच्या यशासाठी बाबांना साकडे घातले. यावेळी त्यांनी साई समाधीवर शॉल आणि फुलांचा हार अर्पण केला. त्यानंतर साई मंदिरालगत असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करून पुन्हा साईबाबांची रात्री होणाऱ्या शेजाआरतीला हजेरी लावली.
दिल्लीत सुरू असलेल्या सामन्यावरही यावेळी त्यांचे लक्ष होते. आरतीनंतर सामन्याचे पारडे बदलले, त्यामुळे त्या रात्री उशिरापर्यत मंदिर परिसरात थांबून राहिल्या. मुंबई इंडियन्सने सामना जिंकल्याचे कळल्यावर पुन्हा साईबाबांच्या गुरुस्थान मंदिराचे पुन्हा दर्शन घेतले. मुंबई इंडीयन्सचा कलर असलेली निळ्या रंगाची शॉल साईसमाधीवर नीता अंबानी यांनी चढवली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात केल्याने अंबानी यांनी पुन्हा आज सकाळी दर्शनाला येत पती मुकेश अंबानींसाठीही प्रार्थना केली. दर्शनानंतर नीता अंबानी यांचा साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी साईमूर्ती, शॉल देऊन सत्कार केला.