अहमदनगर -मुंबई जवळ धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी दोन नंतर वाऱ्याचा वेग वाढला आणि चार नंतर त्याने रौद्र रूप धारण केले.
अहमदनगर जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव, सोसाट्याचा वाऱ्याने जनजीवन विस्कळीत - nisarg cyclone news update
जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब कोसळले. यामुळे दुपार पासून वीज पुरवठा बहुतांशी ठिकाणी खंडित झाला आहे. जिल्हा आपत्कालीन विभाग या सर्व परस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज असेल त्या ठिकाणी मदत कार्य सुरू असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब कोसळले. यामुळे दुपारपासून वीज पुरवठा बहुतांशी ठिकाणी खंडित झाला आहे. जिल्हा आपत्कालीन विभाग या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज असेल त्या ठिकाणी मदत कार्य सुरू असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे.
निसर्ग वादळाचा मुंबईच्या दिशेने दुपारी प्रवास सुरु होता. अरबी समुद्रात घोंगावणारे हे वादळ मुंबईपासून दक्षिणेस 150 किमी अंतरावर होते. कोकण किनारपट्टीवर सकाळी वारे ताशी ८५ किमी वेगाने वाहत होते. परंतु दुपारी अचानक चक्री वादळाने आपला मार्ग बदलला आणि ते उत्तर महाराष्ट्राकडे सरकले.