शिर्डी (अहमदनगर) -गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे. यातील अध्यक्ष अशुतोष काळेंसह नऊ जणांनी आज (शुक्रवारी) शिर्डीत येवून आपल्या विश्वस्त पदाचा पदभार स्विकारला आहे.
औरंगाबाद उच्च न्यायालयाने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ कधी जाहीर होते आणि त्यावर कोणाची वर्णी लागते यांची उत्सुकता होती. अखेर राज्य सरकाने काल (गुरुवारी) रात्री विश्वस्त मंडळाची घोषणा केल्यानंतर आज दुपारी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डीत येवून साई संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी मात्र शिवसेनेच्या कोट्यातील उपाअध्यक्ष अँड. जगदिश हरीषचंद्र सावंत आणि युवा सेनेचे राहुल कनाल हे अनुपस्थीत होते. साई संस्थानचे अध्यक्षपद स्विकाल्यानंतर काळे यांनी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेला प्राधान्य दिल जाईल, असे सांगितले आहे. कोरोनामुळे सध्या मंदीर बंद आहे. राज्य सरकार लवकरच मंदीर उघडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.