महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 3, 2019, 10:34 AM IST

ETV Bharat / state

निळवंडे धरणातून उत्तर नगर जिल्ह्याला पाणी सोडले; अनेक गावांना मिळणार दिलासा

उत्तर नगर जिल्ह्यासाठी निळवंडे धरणातून रविवारी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. १६०० क्युसेक वेगाने धावणारे हे पाणी अकोले संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावातील जनतेची तहान भागवणार आहे.

निळवंडे धरणातून उत्तर नगर जिल्ह्याला पाणी सोडले

अहमदनगर - तहानलेल्या उत्तर नगर जिल्ह्यासाठी निळवंडे धरणातून रविवारी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. १६०० क्युसेक वेगाने धावणारे हे पाणी अकोले संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावातील जनतेची तहान भागवणार आहे.

निळवंडे धरणातून उत्तर नगर जिल्ह्याला पाणी सोडले

हे आवर्तन पिण्यासाठी असून पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रवरा परिसरात फिरते पथक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीचोरी करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. लाभक्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने या पाण्यामुळे अनेक गावांना दिलासा मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details