अहमदनगर- जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या 5 रुग्णांना त्यांचे स्त्राव नमुने निगेटिव्ह आल्याने आज डिस्चार्ज देण्यात आला. आता सद्यस्थितीत 10 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे.
कोरोना डिस्चार्ज पॉलिसीत बदल; जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती - Ahmednagar Corona News
केंद्र आणि राज्य सरकारने स्थलांतरित मजूर, नोकरदार, विद्यार्थी, यात्रेकरु आदींना आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाला अटी-शर्तीवर परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या बाहेरील प्रवाशांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली तयार केली आहे.
![कोरोना डिस्चार्ज पॉलिसीत बदल; जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती discharge corona patients](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7156510-thumbnail-3x2-mum.jpg)
डॉ. प्रदीप मुरंबीकर
कोरोना डिस्चार्ज पॉलिसीत बदल
केंद्र आणि राज्य सरकारने स्थलांतरित मजूर, नोकरदार, विद्यार्थी, यात्रेकरु आदींना आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाला अटी-शर्तीवर परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या बाहेरील प्रवाशांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. सर्वसाधारण, संशयीत तसेच बाधित रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज पॉलिसी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने ठरवण्यात आल्याची माहिती डॉक्टर मुरंबीकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.