महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३६ जण कोरोनामुक्त; १४ रुग्णांवर उपचार सुरू - Evangeline Booth Hospital Ahmednagar

नेवासा येथील रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस यांनी रुग्णाला निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

Evangeline Booth Hospital Ahmednagar
इव्हॅन्जलीन बूथ हॉस्पिटल अहमदनगर

By

Published : May 11, 2020, 12:50 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा येथील एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन सोमवारी घरी परतला आहे. बूथ हॉस्पिटलमधून या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. तसेच सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ आहे. १४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

इव्हॅन्जलीन बूथ हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त नागरिकाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी शुभेच्छांसह दिला निरोप...

हेही वाचा...खुशखबर! बुलडाण्यानंतर आता भंडारा जिल्हादेखील कोरोनामुक्त

नेवासा येथील रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलचा डॉक्टर्स, नर्सेस यांनी रुग्णाला निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या रुग्णानेही त्याच्यावर चांगले उपचार केल्याबद्दल आणि योग्य काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफचे आभार मानले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १,७४५ व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्व‌ॅब) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १,६३९ स्त्राव निगेटिव्ह आले आहेत. तर ५३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यापैकी ३६ व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १३ रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत ०१ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ(संगमनेर) येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या २२ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details