महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुराच्या पाण्यात पिकअपसह तीनजण वाहून गेल्याने प्रवरा नदीत एनडीआरएफचे शोध कार्य सुरू - शिर्डी प्रवरा नदी बातमी

वाहन चालक रात्री काचा खाली करून हा परत जात असताना आश्वी बुद्रुक पुढे जोर्वे नजीक येथे एका पुलावर प्रवरा नदीला पूर परिस्थिती असताना ही पिकअप प्रवरा नदीमध्ये जवळपास 50 ते 75 फूट खाली कोसळली आणि या पुरामध्ये चालक व इतर दोघेजण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह पथकाने शोधकार्य सुरू केले.

ndrf search operation is on in pravara river as three persons along with pickup were washed away in flood waters in ahmednagar
पुराच्या पाण्यात पिकअपसह तीनजण वाहून गेल्याने प्रवरा नदीत एनडीआरएफचे शोध कार्य सुरू

By

Published : Aug 17, 2022, 10:02 AM IST

शिर्डी नाशिकहून संगमनेर तालुक्यातील ओझर गावामध्ये पिकअपमध्ये काचा घेऊन आलेल्या पिकअपसह तिघेजण प्रवरा नदीवरील जोर्वे गावानजीक पुलावरून नदीमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पिकअपमध्ये चालकासह इतर दोघेजण असल्याचं सांगण्यात येत आहे. हे सर्वजण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


प्रवरा नदीला प्रचंड पूर ओझर गावाकडे काचाखाली करून नाशिककडे परत जात असताना प्रवरा नदीला प्रचंड पूर असताना वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये गाडी चालक याच्यासह इतर दोघेजण असल्याचं सांगण्यात येत आहे. पिकअप नाशिक येथील असलम अली खान यांची असून त्यांच्या एमएच 15 एफवी 8943 या पिकअप चालक राहणार जालना येथील असल्याचे बोलले जात आहे. पिकअपमध्ये काचा घेऊन हा वाहनचालक संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आलेला होता.


जवळपास 50 ते 75 फूट खाली कोसळली रात्री काचा खाली करून हा परत जात असताना आश्वी बुद्रुक पुढे जोर्वे नजीक येथे एका पुलावर प्रवरा नदीला पूर परिस्थिती असताना ही पिकअप प्रवरा नदीमध्ये जवळपास 50 ते 75 फूट खाली कोसळली आणि या पुरामध्ये चालक व इतर दोघेजण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह पथकाने शोधकार्य सुरू केले. त्यानंतर एनडी आरएफचे पथक हे शोध कार्य सुरू करत असून प्राप्त माहितीनुसार पोलिसांना याबद्दल शोध कार्य सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details