अहमदनगर -शहर वाहतूक शाखेच्या ढिसाळ कारभारामुळे जड वाहतुकीने एका महिन्यात तीन जणांचे बळी गेले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. या विषयी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
वाढते अपघात आणि वाहतूक शाखेच्या ढिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी आक्रमक हेही वाचा -अहमदनगर : तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जड वाहतुकीला बंदी असून देखील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी बायपास रस्त्यावर थांबून जड वाहतूक शहरात दाखल करण्यासाठी अर्थपूर्ण तडजोड करतात. त्यामुळे जड वाहतूक शहरातून ये-जा करत असल्याने अपघात होत असून निष्पाप नागरिकांचा त्यात बळी जात आहेत. यात शहर वाहतूक शाखेच्या कारभारात सुधारणा न झाल्यास येत्या 27 जानेवारी स्टेट बँक चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही 26 जानेवारीला युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवेदन देणार आहेत.
हेही वाचा -जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक