अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षापदी निवड करण्यात आली. संघटनेची पुर्नबांधणी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्या राज्यभर दौरा करत आहेत. अहमदनगर येथे दौऱ्यावर असताना महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
विधानसभेत महिलांना अधिक संधी देण्यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरणार - रुपाली चाकणकर - sharad pawar
अहमदनगर येथे दौऱ्यावर असताना महिला कार्यकर्त्या-पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
पक्षामध्ये अनेक सक्षम महिला कार्यकर्त्या आहेत. राज्यात पक्षवाढीसाठी यापुढे काम करणार असून, येत्या विधानसभा निवडणुकीत महिला कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उमेदवारी द्यावी. यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रा वाघ यांनी अचानक पक्ष सोडला असला तरी १२ तासाच्या आत नवीन महिला प्रदेशाध्यक्षाची नेमणूक करण्यात आली. नेते दुसऱ्या पक्षात जात असले तरी कार्यकर्ते साहेबांसोबतच असून, पक्षाकडे अनेक सक्षम पर्याय असल्याचा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल आणि पुन्हा पक्षाला वैभव प्राप्त होईल. राज्यात पक्षाची ताकद निश्चित वाढलेली असेल, असेही चाकणकर म्हणाल्या.