महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil : पाडव्याला बोलयाचं नाही, म्हणत जयंत पाटील अखेर बोललेच, मुख्यमंत्र्यांवर टीका - मुख्यमंत्र्यांवर टीका

Jayant Patil On Eknath Shinde: रोहा येथील महिलेला मारहाण केल्याची घटना निंदणीय आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र ती व्यक्ती राष्ट्रवादीचा पदाधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांनी आज शिर्डीत दिले आहे.

Jayant Patil On Eknath Shinde
Jayant Patil On Eknath Shinde

By

Published : Oct 26, 2022, 4:37 PM IST

शिर्डी :रोहा येथील महिलेला मारहाण केल्याची घटना निंदणीय आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र ती व्यक्ती राष्ट्रवादीचा पदाधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांनी आज शिर्डीत दिले आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका

व्हिडिओची चौकशी : सोशल माध्यमांवर एका महिलेला अमानुष मारहाण करतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषदेच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ मधील घटना नंदनिय असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांनी संबधित व्यक्तीवर कारावाई करावी, अशी मागणी होत आहे. यावर बोलतांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबधित व्हिडिओ आपल्याला मिळाला असून संबधित कृत्य गंभीर आहे. तसेच या व्हिडिओची चौकशी करण्यास सांगितले असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहे.

भाजपवर खोचक टीका : तसेच हे कृत्य करणारा व्यक्ती राष्ट्रवादीचा पदाधिकारी नसल्याचे देखील सांगितले आहे. रोहा येथील व्हिडिओ बाबत राष्ट्रवादीने हात झटकले असून संबधित कृत्य करणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी नसल्याचे सांगितले आहे. राज्यात मनसे भाजपा आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. भाजपला हे लक्षात आले की आपण अपुरे आहेत, याची जाणीव भाजपाला झाली असल्याची खोचक टिकाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे.

साईबाबांच्या समाधीचे दर्शन: मात्र दिवाळीत भाजपा पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब झाल्याने, तेव्हा आता त्यांनी याची नोंद घ्यावी, असा सुचक ईशाराही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना पाटील म्हणाले की, दिवाळी आणि पाडव्याच्या मुहर्तावर साई दर्शन झाले. तेव्हा आजच्या दिवशी काहीच बोलायच नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बरच काही बोलून गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details