अहमदनगर- मातीतील कुस्ती टिकलीच पाहीजे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गादी अर्थात मॅटवरील कुस्तीतही खेळाडूंनी प्राविण्य मिळविले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. याचबरोबर शहरासह ग्रामीण भागातून कुस्तीमध्ये मुलींच्या वाढत असलेल्या सहभागा बद्दलही पवार यांनी समाधान व्यक्त केले. रोहित पवार यांनी जिल्ह्यातील कर्जत येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी मॅटवरील कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवावे - शरद पवार - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
रोहित पवार यांनी कर्जत येथे साहेब चषक नावाने घेतलेल्या स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धेत इराण, अफगाणिस्तान आदी ठिकाणाहून पैलवान आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
साहेब चषक नावाने घेतलेल्या स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धेत इराण, अफगाणिस्तान आदी ठिकाणाहून पैलवान आले होते. वेगवेगळ्या वजन गटातील मल्लांच्या कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी कर्जत आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. त्याचीच ही तयारी असल्याची चर्चा आहे. मात्र, ही राजकीय कुस्तीची दंगल नाही. या भागात अनेक स्पर्धा घेतल्या असून आगामी काळातही सुरू राहतील, असे रोहित म्हणाले. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामध्ये रोहित पवार यांनी कुस्तीच्या आखाड्याच्या माध्यमातून विधानसभेच्या आखाड्यातील रणसंग्रामचे रणशिंग शरद पवारांच्या उपस्थित फुंकले हे निश्चित आहे.