महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्यात ७० हजार जागांची भरती करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात त्यांच्याच पक्षात केली मेगाभरती' - धनंजय मुंडे यांनी अकोले येथील सभेत

मधुकर पिचड यांनी चाळीस वर्षे सत्ता उपभोगली... मग मतदारसंघात इतके काम केले आहे, तर गुजरातच्या शाहला तुमच्या प्रचारासाठी येथे का यावं लागतय? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अकोले येथील सभेत केला.

अकोले येथील सभेत बोलताना धनंजय मुंडे

By

Published : Oct 17, 2019, 10:19 AM IST

अहमदनगर -अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे, यांच्या प्रचारसाठी धनंजय मुंडे अकोले येथे आले होते. यावेळी सभेत बोलताना मुंडे यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी उमेदवार वैभव पिचड यांच्यावर जोरदार टीका केली.

अकोले येथील सभेत बोलताना धनंजय मुंडे

हेही वाचा... दहा-पाच रुपयात जेवण द्यायला महाराष्ट्र भिकेला लागला आहे का, राज ठाकरेंचा सेना-भाजपवर घणाघात

मधुकर पिचड आणि वैभव पिचडांवर मुंडेची टीका

एखाद्या माणसाला पक्ष का सोडावा लागतो. चाळीस वर्षे पिचडांना पवारांनी भरभरुन दिले. त्या पिचडांनी एकाचे दोन केले आणि दुसऱ्याने 15 कोटी केले. यामुळे पिचडांना पक्ष बदलण्याची वेळ येत आहे. मुख्यमंत्री पारदर्शकचा दावा करतात, पाच वर्षात भ्रष्टाचार झाला नाही म्हणतात. मात्र राज्यातील 90 हजार कोटींचे घोटाळे मुख्यमंत्र्यांनीच गिळलेत, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

हेही वाचा... मी प्रचाराला येणार नाही.. मुख्यमंत्री फडणवीसांचे नागपूरकरांना भावनिक आवाहन​​​​​​​

लोकसभेत बहुमत मिळवूनही भाजप, 'याला घेवु की त्याला' असे करत आहे. सत्तर हजार जागांची मेगा भरती करणार असे तरूणाना सांगितले होते. मात्र त्यांना पक्षात मेगा भरती केली आहे, अशी तिरकस टीका मुंडे यांनी यावेळी केली. तसेच उद्या गुरूवारी अकोलेत अफजल खान येणार आहे, असे मी नाही तर उद्धव ठाकरे बोलतात.. असे बोलत मुंडेनी अमित शाह यांची खिल्ली उडवली.

ABOUT THE AUTHOR

...view details