अहमदनगर - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने शिर्डीत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शिर्डी नगरपंचायतीसमोर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले. तसेच काही कार्यकर्त्यांनी टरबुजे फोडून आनंद व्यक्त केला.
महाविकास आघाडीचं सरकार आल्याने टरबुजे फोडून शिर्डीत जल्लोष - MP Sanjay Jadhav celebration in delhi
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने शिर्डीत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शिर्डी नगरपंचायतीसमोर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले. तसेच काही कार्यकर्त्यांनी टरबुजे फोडून आनंद व्यक्त केला.
महाविकास आघाडीचं सरकार आल्याने टरबुजे फोडून शिर्डीत जल्लोष
यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाच्या जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवण्यात येणार असल्याची माहिती सुरेश थोरात यांनी दिली.