अहमदनगर - शिर्डी येथे पार पडलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंचा बोलबाला राहिला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची रेश्मा माने हिने सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, राहाता तालुका कुस्ती तालीम संघ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत २६ राज्यातील शेकडो कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा -राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : हरियाणाच्या नैना आणि पूजाला सुवर्णपदक
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा सिकंदर शेख याने सुवर्णपदकाची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा रोवला. कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने ६२ किलो वजन गटात दिल्लीच्या अनिताचा पराभव केला.
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी रेश्मा माने.... दरम्यान, महिला कुस्तीपटूंची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी गर्दी केली होती. दिवसभर सुरू असलेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये रेश्मा माने हिने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या फेरीपासून आपल्या कुस्तीचा जलवा उपस्थितांना दाखवत प्रतिस्पर्ध्याला चितपट करून महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुस्तीच्या खेळात सुवर्णपदकाची कमाई केली.
हेही वाचा -साईबाबांच्या नगरीत रंगली देशभरातील पैलवानांची 'दंगल'