महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी साईबाबा मंदिरावर फडकवण्यात आला राष्ट्रध्वज - Shirdi Saibaba Temple national flag

स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने शिर्डीच्या साईबाबा मंदिरवर राष्ट्रध्वज फडकवण्यात national flag hoisted at Shirdi Saibaba Temple आला. साईबाबा संस्‍थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या हस्ते साईसमाधी मंदिराच्या कळसा जवळ सकाळी ध्वाजारोहन करण्यात आले.

national flag hoisted at Shirdi Saibaba Temple
शिर्डी साईबाबा मंदिरावर फडकला राष्ट्रध्वज

By

Published : Aug 15, 2022, 10:54 AM IST

अहमदनगरस्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने शिर्डीच्या साईबाबा मंदिरवर राष्ट्रध्वज फडकवण्यात national flag hoisted at Shirdi Saibaba Temple आला. साईबाबा संस्‍थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या हस्ते साईसमाधी मंदिराच्या कळसा जवळ सकाळी ध्वाजारोहन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त महेंद्र शेळके, आदी उपस्थित होते.

माहिती देताना साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे

हेही वाचामंत्री विखे पाटील म्हणतात अजूनही काही माजी मंत्री जेलमध्ये जाऊ शकतात

अमृत महोत्सवानिमित्ताने साईमंदिरात तिरंगाप्रमाणे रंगसंगती वापरत आकर्षक सजावट करण्यात आली. साई मूर्तीच्या बाजूला तिरंगी फुले लावण्यात आली आहे. त्याचबरोबर समाधी मंदिर, व्दारकामाई, गुरुस्थान अशा ठिकाणी तिरंगी फुले लावून अशोकचक्र वापरत सजावट करण्यात आली आहे. सलग सुट्या असल्याने, तसेच श्रावणी तिसरा सोमवारमुळे साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची चांगलीच गर्दी पाहवयास मिळत आहे.

कधी झाले होते साईमंदिरावर प्रथम ध्वजारोहणस्वतंत्र महाराष्ट्राच्या घोषणेच्या चार दिवस आधीच साईमंदिराच्या कळसा जवळ भारतीय ध्वज फडकाविण्यात आला होता. पूर्वी स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी साई मंदिरावर राष्ट्रीय ध्वज फडकविला जात असल्याची प्रथा होती. मात्र, कालांतराने गर्दी आणि जागे अभावी सरंजाम बाग येथे ध्वजावंदन होवू लागले. अलिकडच्या काळात संस्थानचा विस्तार वाढला असून ध्वजावंदनासाठी स्वतंत्र जागी मानवंदना देत इतर कार्यक्रम होत असल्याचे साईबाबा संस्थानचे विश्वस्त एकनाथ गोंदकर यांनी सांगितले.

अमृतमहोत्सव दिनाआधी सूवर्ण महोत्सव वर्षात देखील साई मंदिरावर स्वातंत्र्या दिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन अध्यक्षाच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविला गेला होता. या वर्षीच्या अमृत महोत्सवाच्या या ऐतिहासिक दिनी साई मंदिरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचा मिळालेला मान हे भाग्य असल्याचे साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी म्हटले.

हेही वाचाHar Ghar Tiranga हर मंदीर हर मज्जिदवर तिरंगा फडकवतण्याचा ऐतिहासिक निर्णय

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details