अहमदनगर- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबी-खालसा फाट्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एका बसचा अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिक-सांगली बस दुभाजकावर आदळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नाशिक-सांगली बसचा आंबी-खालसा फाट्याजवळ अपघात; जीवितहानी नाही - मिरज
सांगलीमधील मिरज आगाराची बस नाशिकहून सांगलीला जात होती. यावेली चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर आदळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सांगलीमधील मिरज आगाराची बस (क्रमांक एम. एच. १४ बी. टी. ४६३३) नाशिकहून सांगलीला जात होती. दरम्यान, समोरून आलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अनियंत्रित बस दुभाजकावर गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेत दुभाजकामध्ये असलेल्या सुमारे ५० जाळ्या या बसच्या धडकेने तुटल्या आहेत. सुदैवाने बसचा मोठा अपघात टळला. बसमधील ४२ प्रवाशी सुखरूपरित्या बसमधून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आले.