महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक-पुणे महामार्गावर कोसळले दगड, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील घटना

नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापूरी घाटात सतत मोठ-मोठे दगड कोसळत आहेत. आजही मोठे दगड थेट महामार्गावर येवून पडले. सुदैवाने कोणतेही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा मार्ग पोलीस आणि नागरिकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढून तुर्तास मोकळा केला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर कोसळले दगड, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील घटना

By

Published : Jul 11, 2019, 5:06 PM IST

शिर्डी -नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटत दगड कोसळल्याची घटना घडली. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट येथे महामार्गावर सतत मोठ-मोठे दगड कोसळत असल्याने हा भाग जिवघेणा झाला आहे. लवकरच कोसळणाऱ्या दरड काढल्या गेल्या नाहीत तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर कोसळले दगड

नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात सतत मोठ-मोठे दगड कोसळत आहेत. आजही मोठे दगड थेट महामार्गावर येवून पडले. सुदैवाने कोणतेही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा मार्ग पोलीस आणी नागरिकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढून तुर्तास रस्ता मोकळा केला आहे. हे दगड रस्त्यावर कोसळणे हि नित्याची बाब झाली आहे. महामार्ग बनवताना मोठाले डोंगर फोडून रस्ता बनवला. मात्र, आता या रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरून दरड कोसळत आहे. डोळ्यांना हा परिसर नयनरम्य वाटत असला तरी अशा प्रकारच्या दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होवू शकते. नाशिक पुणे महामार्गावर दररोज हजारो वाहनांची ये जा सुरू असते, अशावेळी जर ही दरड कोसळली तर मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे धोकादायक झालेल्या दरड लवकर हटवण्याची गरज आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details