अहमदनगर - नारायण राणे मोठे नेते आहेत. आमच्यासारखे तरूण त्यांच्याकडे बघतात. मोठे नेते कसे बोलतात याकडे आम्ही बघत असतो. मोठ्या नेत्याने चुकीचे वक्तव्य केले, तर आमच्यासारख्या नवीन आमदारांना वाटते अशा प्रकारचे वक्तव्य होऊ नये.आम्ही सर्वजण जशी काळजी घेतो तशी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी नगरपालिकेच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या भुमिपूजन प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'यात कोणतही राजकारण नाही' -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेटीवरही रोहित पवार यांनी भाष्य केले. या बैठकीचा अजेंडा ओबीसी आरक्षणाचा विषय होता. यावेळी ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली असावी, यात कोणतही राजकारण नाही. भाजपाचे लोक यात राजकारण असल्याचे बोलत आहे, त्यात तथ्य नाही. विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आरक्षणासाठी जे बिहारला घडले, ते महाराष्ट्रात घडताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - पुणे मनपाने दिले प्रति दिन 10 लाख रुपये दंड वसुलीचे टार्गेट, ही तालिबानी वत्ती असल्याची रिटेल व्यापारी संघाची टीका