आम्हाला संशय होता तेच पुढं येतंय अहमदनगर :सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यात चर्चेत आलेली नाशिक पदवीधर निवडणूक जोरदार चर्चेत आली. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अहमदनगरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघातील नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक : बैठकीस काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, जिल्हा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, शहर अध्यक्ष संभाजी कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे आदी मविआचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे आजही अनुपस्थित दिसले.
माविआच्या उमेदवार शुभांगी पाटील :शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या माविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी नेते, कार्यकर्ते यांचे आशीर्वाद मागत विजयी करण्याचे आवाहन केले. मी मविआची उमेदवार असल्यानेच शिवसेनेचा पाठींबा आहेच पण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज उपस्थित असल्याचे सांगत सत्यजित तांबेंच्या भाजप उमेदवारीवर शुभांगी पाटील यांनी भाष्य केले . बाळासाहेब थोरतांबरोबर आपले फोनवर बोलणे झाले असून आपला विजय निश्चित असल्याचे शुभांगी पाटील म्हणाल्या.
सत्यजित तांबेंबाबत संशय खरा ठरला :सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचा निर्णय भाजपचा झाला असल्याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता. सत्यजित तांबेंबाबत जो संशय होता तो खरा ठरत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. डॉक्टर सुधीर तांबे यांना एक नव्हे तर दोन कोरे एबी फॉर्म दिल्याचा गौप्यस्फोट केला. दोन-दोन एबी फॉर्म देऊनही त्यांनी वेगळा पर्याय निवडला आणि भाजप जर पाठिंबा देत असेल तर आता आमचा संशय खरा ठरत असल्याचे नाना पटोले म्हणाले. माविआच्या उमेदवार या शुभांगी पाटील असून त्याच निवडून येतील कारण हा मतदारसंघ काँग्रेस विचारांचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षांकडेच अहमदनगर ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्षपद दिल्याची माहिती यावेळी किरण काळे यांनी दिली.
हेही वाचा :Nanded Crime : प्रेमसंबंधामुळे मुलीचे ठरलेले लग्न मोडले; वडीलांनी काका, मामाच्या मदतीने केला पोटच्या लेकीचा खून