शिर्डी ( अहमदनगर ) - नॅशनल हेरॉल्डसंबंधी सुरू असलेल्या जुन्या प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावलं ( ed notice soniya gandhi and rahul gandhi ) आहे. त्यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. देशात धार्मिक तेढ निर्माण करत हुकूमशाही करू पाहणाऱ्या मोदी सरकारने सातत्याने नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केली आहे. हे देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. सोनिया गांधी यांच्यावर केलेली ईडीची कारवाई ही भाजपाच्या किडक्या डोक्यातून निघालेली आहे, असा संताप नाना पटोलेंनी व्यक्त ( nana patole criticized bjp ) केला आहे.
शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवसंकल्प कार्यशाळेत पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, भोरचे आमदार संग्राम थोपटे, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजीव वाघमारे आदी उपस्थित होते.
नाना पटोले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाने सातत्याने देशांमध्ये जाती-जाती, धर्म-धर्मामध्ये द्वेष निर्माण केला आहे. देश विक्री करणाऱ्या या सरकारने सुरूवातीपासून देशाची अस्मिता असलेल्या नेहरू- गांधी घराण्यावर टीका केलेली आहे. आठ वर्षापूर्वी संपलेले प्रकरण नवसंकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उकरून काढले आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही फक्त राजकीय द्वेषातून झाली असून भाजपाच्या किडक्या डोक्यातून निघालेली ही आयडीया आहे. परंतु, भाजपाने कितीही कारवाया केल्या तरी काँग्रेस कधीही घाबरणार नाही. संपूर्ण देश सोनिया गांधींच्या पाठीशी आहे.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं की, अशा प्रकारच्या कारवाया होणे हे अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीला घातक आहे. काँग्रेस पक्षाने काय सर्वधर्मसमभाव जोपासला. सर्व जाती धर्मांना समान न्याय दिला आहे. या चिंतन शिबिरातून मागासवर्गीय समाजाला ही मोठ्या संधी देण्याबरोबरच त्यांच्या विभागासाठी असलेली आर्थिक तरतूद पूर्णपणे खर्च होण्यासाठी काही सूचना सदस्यांनी मांडले आहेत. याबाबत विचारविनिमय करण्यात आल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -Dynastic Politics : राष्ट्रवादी, शिवसेनेह इतर पक्ष म्हणजे राजकारणातील घराणेशाही, भाजप तत्व सोडणार नाही - जे पी नड्डा