महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार सुजय विखेंच्या शिष्टाईनंतर नामदेव राऊतांचे बंड थंड; राम शिंदेंचा करणार प्रचार - sujay vikhe

खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्तीनंतर राऊत यांनी त्यांचे बंड मागे घेतले आहे. नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याची घोषणा केली.

नामदेव राऊत

By

Published : Sep 21, 2019, 11:52 AM IST

Updated : Sep 21, 2019, 12:02 PM IST

अहमदनगर- नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रीय राहणार असल्याची घोषणा केली. खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्तीनंतर राऊत यांनी त्यांचे बंड मागे घेतले. महासंग्राम युवा मंचच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली. प्रा. राम शिंदे हे भारतीय जनता पार्टीकडून कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचे प्रतीनिधित्व करतात. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार हे निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे येथील निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. याच कारणाने या मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नामदेव राऊतांचे बंड मागे

कर्जत येथे महासंग्राम युवा मंचचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यानंतर पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले की, राऊत यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची मनधरणी करण्याची जवाबदारी माझ्यावर सोपवली. विधानसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार येणार आहे. राऊत यांच्या कामाची पक्ष दखल घेईल व राज्यात ओबीसीचे नेते म्हणुन त्यांना पुढे आणले जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्यांनी पक्षासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.

Last Updated : Sep 21, 2019, 12:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details