महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती मजबूत; प्रशासकांचा ठेवीदारांना दिलासा - ahmadnagar

गुरुवारी अचानक आरबीआयने प्रशासकाची नियुक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांमधे काळजी वाढवली होती. मात्र, शुक्रवारी आरबीआय चे नियुक्त प्रशासक सुभाष मिश्रा यांनी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

नगर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती मजबूत

By

Published : Aug 3, 2019, 8:27 AM IST

अहमदनगर- बँकिंगची एकशे दहा वर्षांची मोठी परंपरा असलेली आणि जिल्हा सहकारी बँक खालोखाल जिल्ह्यात जाळे असलेल्या नगर अर्बन को-ओप.(मल्टिस्टेट दर्जा) बँक आहे. गुरुवारी अचानक आरबीआय ने प्रशासकाची नियुक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांमधे काळजी वाढवली होती. मात्र, शुक्रवारी आरबीआय चे नियुक्त प्रशासक सुभाष मिश्रा यांनी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

नगर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती मजबूत

कोणत्याही ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व ग्राहकांना आपले नियमित व्यवहार सुरू ठेवण्याचेही मिश्रा यांनी आवाहन केले. एनपीए खात्यांच्या बाबतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. त्याबाबत तक्रारी आल्याने आरबीआय ने गुरुवारी नगर अर्बन बँकेवर मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. आज मिश्रा यांनी एनपीए असलेल्या खात्यात सुधारणा करण्यापूर्ती आपली नेमणूक असल्याचे सांगताना बँकेची स्थिती चांगली असल्याचेही स्पष्ट केले.


दिलीप गांधी यांचे ठेवीदार-ग्राहकांना आवाहन
बँकेला मोठी परंपरा असून लहान-मोठे अनेक ठेवीदार हे बँकेचे बलस्थान आहेत. बँकेची स्थिती चांगली आणि मजबूत असून कुणाही ठेवीदाराला चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विरोधकांचा गांधींवर निशाणा
चुकीचे कर्ज वाटप, व्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी केल्या नंतर उशिरा का होईना, आरबीआय ने प्रशासक नेमल्याचे गांधी यांचे बँकेतील विरोधक वसंत लोढा यांनी सांगत गांधींवर निशाणा साधला आहे.विद्यमान संचालक मंडळाची मुदत डिसेंबर महिन्यापूर्वी संपत असल्याने येणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी प्रशासक नेमणुकीच्या निमित्ताने आता पासूनच सुरू झाल्याचे बोलले जातेय.



ABOUT THE AUTHOR

...view details