महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बाबांनी मला वेळ दिला नसल्याची खंत, पण माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत' - आमदार धीरज देशमुख लेटेस्ट बातमी

अमृतवाहिनी महाविद्यालयातील युवा सांस्कृतिक महोत्सवात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात  महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांसोबत अवधूत गुप्ते यांनी संवाद साधला. कार्यक्रमात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना गुप्तेंनी बोलते केले.

MLA dhiraj deshmukh
आमदार धीरज देशमुख

By

Published : Jan 17, 2020, 9:30 PM IST

अहमदनगर - मी बाबांचा प्रवास आमदारकी, मंत्रीपद ते मुख्यमंत्री असा झालेला पाहिला. एक मुलगा म्हणून खंत असायची, की माझे बाबा माझ्यासोबत कमी वेळ घालवतात. मला वडिलांचा सहवास फार मिळाला नाही. मात्र, आज निवडणूक लढताना सभागृहात जाताना मला बाबा समजायला लागले. एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी खूप काही करू शकतो. मात्र, इतरांच्या कुटुंबासाठी किती करू शकतो हे बाबांनी समाजासाठी केलेल्या कामावरून जाणवले. म्हणून माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत, असे आमदार धीरज देशमुख म्हणाले आहेत. मात्र, असे अनेक तरुण मला भेटतात जे म्हणतात, तुमचे बाबा आमचे हिरो आहेत, त्याचा अभिमान मला आजही वाटतो, असेही धीरज म्हणाले. धीरज हे माजी मुख्यमंत्री दिवगंत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत.

आमदार धीरज देशमुख

अमृतवाहिनी महाविद्यालयातील युवा सांस्कृतिक महोत्सवात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांसोबत अवधूत गुप्ते यांनी संवाद साधला. कार्यक्रमात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना गुप्तेंनी बोलते केले. यावेळी संगीतकार अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुखांचे कुठल्या भावावर जास्त प्रेम आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता लगेच रितेश, असे उत्तर धीरज देशमुख यांनी दिले.

हेही वाचा -मुघलांचे वंशजही शिवरायांच्या वंशजांविरोधात 'असे' बोलले नसते - फडणवीस

करिअर निवडताना बॉलिवूड आणि राजकारण यांच्यापैकी राजकारणाचे पारडे कसे जड झाले? यावर बोलताना ते म्हणाले, लहान भाऊ म्हणून नेहमी माझ्यासमोर एक प्रश्न होता. मोठे भाऊ जे काम करतात त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत समोर जाण्याचे संस्कार घरातूनच आपल्यावर होत असतात. माझ्या घरच्यांचीही हिच अपेक्षा होती. माझा एक भाऊ राजकारणात आहे, एक बॉलिवूडमध्ये आहे. मात्र, या दोन्ही फिल्डमध्ये लोक ठरवतात की तुम्ही टिकणार की नाही. या फिल्डमध्ये यायचे हे आपण ठरवतो. पक्षतिकीट देतो. मात्र, निवडून द्यायचे की नाही हे लोक ठरवतात. लातूरच्या लोकांनी ठरवले मी राजकारणात यायचे आणि मी निवडून आलो, असे धीरज म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, बाळासाहेब थोरात हे लातूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी आमचा स्नेह होता. बाबा मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यासोबत विमानात फिरण्याचा छंद पूर्ण व्हायचा. बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या जेव्हाही बैठका किंवा दौरा असायचा. लातूरची कुठलीही अडचण असेल तर ते आवर्जून बाळासाहेबांना फोन करायचे. बाबांना माहित होते, की नगरपेक्षा जास्त न्याय ते लातूरला देऊ शकतील. १९९९ साली बाळासाहेबांनी थोरात यांनी बाबांकडून कृषी खाते मागितले आणि बाबांनी ते लगेच दिले. कारण त्यांना माहित होते, की ते या क्षेत्राला पुढारण्याचे काम करतील, असे सांगत धीरज यांनी बाळासाहेब थोरातांवर स्तुती सुमने उधळली.

हेही वाचा -...आणि रोहित पवारांनी मंचावरूनच लावला नरेंद्र मोदींना फोन

विलासराव देशमुख यांच्या नजरेतील मराठवाडा हा दुष्काळमुक्त मराठवाडा आहे. आमच्या महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय हे दुष्काळमुक्तीसाठी घेण्यात आले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ त्या विचाराने चालत आहे. महाराष्ट्र हा नंबर एक होता आणि राहिल हे त्यांचे स्वप्न होते. मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापुढे राज्यात विकासाचाच पॅटर्न चालेल, असा विश्वासही धीरज यांनी यावेळी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details