महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अयोध्येतील राममंदिरासाठी मुस्लिम बांधवांकडून ५१ हजारांचा निधी सुपूर्द

अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लिम बांधवानी 51 हजारांचा निधी समितीचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी यांच्याकडे दिला आहे.

धनादेश देताना
धनादेश देताना

By

Published : Jan 18, 2021, 3:26 PM IST

Updated : Jan 18, 2021, 3:45 PM IST

अहमदनगर - अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लिम बांधवानी 51 हजारांचा निधी समितीचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी यांच्याकडे मशिदीत एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द करुन देशातील सर्वधर्मीय बांधवाना एकतेचा अनोखा संदेश दिला.

बोलताना स्वामी गोविंद देव गिरी व हाजी अकबर सय्यद
बेलापूरचे भुषण तसेच पूर्वाश्रमीचे आचार्य किशोर व्यास तथा स्वामी गोविंद देव गिरी यांची केंद्र सरकारने अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण समितीचे विश्वस्त व कोषाध्यक्षपदी नियुक्ती नंतर प्रथमच नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जन्मभूमी बेलापूरला भेट देऊन बालाजी मंदिरात दर्शन घेतले. स्वामींच्या दौऱ्याची माहिती मिळताच येथील मुस्लिम बांधवांनी अल्पावधीतच 51 हजारांचा निधी संकलित करुन स्वामींकडे मशिदीत बोलावून सुपूर्द केला. तसेच राष्ट्रस्तरीय पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल स्वामींचा सन्मानही केला. यावेळी हाजी इस्माईल शेख, अकबर सय्यद यांची भाषणे झाली. मंदिरासाठी आणखी निधी संकलित करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
Last Updated : Jan 18, 2021, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details