महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 17, 2020, 3:19 PM IST

ETV Bharat / state

युवा आमदारांशी संवाद:  'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'

जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आज एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. संगमनेरमधील मेधा 20202 महोत्सवामध्ये गायक अवधूत गुप्ते यांनी महाविकास आघाडीच्या युवा आमदारांची मुलाखत घेतली. या संवाद सत्रामध्ये काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, आमदार झिशान सिद्दीकी आणि आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

musician avadhoot gupte interview young mla in maharashtra
युवा आमदारांशी संवाद

अहमदनगर - जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आज एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. संगमनेरमधील मेधा 20202 महोत्सवामध्ये गायक अवधूत गुप्ते यांनी महाविकास आघाडीच्या युवा आमदारांची मुलाखत घेतली. या संवाद सत्रामध्ये काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, आमदार झिशान सिद्दीकी आणि आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना या सहाही युवा आमदारांनी दिलखुलास उत्तरे दिली.

युवा आमदारांशी संवाद

काय म्हणाले युवा आमदार

आदित्य ठाकरे

महाविकास आघाडी ही विचारांच्या आधारे एकत्र आली आहे. राज्याच्या विकासाचा दृष्टीकोण समोर ठेऊन आम्ही एकत्र आलो असल्याचे वक्तव्य आमदार आदित्य ठाकरेंनी केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या लोकांसोबत काम करणे सोपे आहे. कारण हे लोक आपल्यासारखेच आहेत. महाराष्ट्राला गरज असताना नाती एकत्र आल्याचे ठाकरे म्हणाले. राज्याचे चित्र बदलले आहे, आता देशाचेही चित्र बदलेल असेही ठाकरे म्हणाले. तसेच सभागृहात जाण्याची माझीच हौस होती असेही ते म्हणाले. राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

रोहित पवार

पवारसाहेबांचा आदर्श घेऊनच राजकारणात आलो आहे. येणाऱ्या काळात जनतेच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. लोकांच्या जे मनात होते शेवटी तेच झाले. महाविकास आघीडीचे समीकरण हे विचारधारेवर एकत्र आल्याचे पवार म्हणाले. येणाऱ्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीतही हे समीकरण पाहायला मिळेल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. निवडणुक लढवण्यासाठी कर्जत जामकेड हाच मतदारसंघ का निवडला या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, विकास करण्याच्या खूप मोठ्या संधी या मतदारसंघात होती. गेल्या ३० वर्षापासून या मतदारसंघाचा विकास झाला नव्हता. आणि विशेष म्हणजे या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने घराणेशाहीचा कोणी विषयच काढणार नसल्याचे पवार म्हणाले. मी निवडूण आल्यानंतर वडिलांच्या डोळ्यात पाणी आले कारण लोकांनी मला ऐवढ्या मोठ्या मतांनी निवडूण दिले.

आदिती तटकरे

लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारण घरात असल्याने त्याचे संस्कार माझ्यावर झाले. मी कधीही ठरवलेल नव्हते की मला राजकारणात यायचे आहे ते. मात्र, लोकांसाठी काम करायचे ठरवून राजकारणात आल्याचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. येणाऱ्या काळात किल्ले संवर्धन णि पर्यटनाच्या क्षेत्रात चांगले काम करणार असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले. वडिलांची इच्छा नव्हती की राजकारणात यावे. मात्र, मी काम करण्याचे ठरवल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या.

धीरज देशमुख

माझे वडिल (दिवंगत विलसराव देशमुख) हे माझ्यासाठी माझे हिरो आहेत. तर माझे दोन्ही भाऊ हे माझे रोल मॉडेल आहेत. राजकारणात येण्याचा निर्णय हा लोकांनी घेतला. कारण राजकारणामध्ये टिकाल की नाही हे लोक ठरवतील. माझे वडिल म्हणून त्यांनी माझ्यासाठी त्यांनी कमी वेळ दिला. सातत्याने ते जनतेमध्ये असायचे. मात्र, विलासराव देशमुखांचे काम मला आज समजत आहे. माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत मात्र, अनेक लोक मला म्हणतात की विलासराव देशमुख आमचे हिरो आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब थोरातांना विचारले होते की, तुम्हाला कोणते खाते हवे आहे. त्यावेळी बाळासाहेब थोरातांनी कृषी खाते मागितले होते. ते खाते विलासरावांनी बाळासाहेबांना दिल्याचे धीरज देशमुख म्हणाले.



झिशान सिद्दीकी

माझ्या वडिलांनी जनतेसाठी काम केले आहे. मी त्यांना सातत्याने बघत आलो आहे. त्यामुळे मलाही समाजसेवेची आवड लागल्याचे युवा आमदार झीशान सिद्दीकी म्हणाले. माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे असल्याने माझ्या मतदारसंघात भरपूर निधी मिळेल असे सिद्दीकी म्हणाले.

ऋतुराज पाटील

आजोबा डी वाय पाटील आणि काका मंत्री सतेज पाटील यांनी केलेला संघर्ष मी जवळून बघितला होता. त्यांनी केलेल्या कामाचा वारसा होता. त्यामुळे आपोआपच या क्षेत्रात मी आलो. मी एक कार्यकर्ता म्हणून राबलो असून, पुढेही कार्यकर्ताच म्हणून राहणार असल्याचे पाटील म्हणाले. आमच्या कुटुंबांची समाजसेवेची प्रथा आहे. त्यामुळे मी शिक्षणासाठी बाहेर गेलो असलो तरी आपलं हे आपलंच असते म्हणून मी राज्यासाठी काम करण्याचे ठरवले. शेतीची आमची नाळ चांगली आहे. त्यामुळे आम्ही शेती क्षेत्रात चांगले काम करु.

ABOUT THE AUTHOR

...view details