महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत वकिलासह सहकार्‍याची निघृण हत्या; आरोपीला अटक - अ‍ॅड. संभाजी ताके हत्या

अ‍ॅड. संभाजी ताके हे पत्नी आणि दोन मुलांसह भिंगार शहरानजीक असलेल्या नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहत होते. अ‍ॅड. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळ आहे. ते आज गावाकडे काही कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांची हत्या करण्यात आली.

शिर्डीत वकिलासह सहकार्‍याची निघृण हत्या

By

Published : Oct 2, 2019, 6:12 PM IST

अहमदनगर- जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. संभाजी ताके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी, अशा दोघांची नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती गाव येथे निघृण हत्या झाली आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी शरद शिवाजी ताके याला अटक केली आहे. त्याच्याकडून कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे.

शिर्डीत वकीलासह सहकार्‍याची निघृण हत्या

हेही वाचा-भाजपचे 'कुबेर'..! मंगलप्रभात लोढांच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

अ‍ॅड. संभाजी ताके हे पत्नी आणि दोन मुलांसह भिंगार शहरानजीक असलेल्या नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहत होते. अ‍ॅड. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळगाव आहे. ते आज गावाकडे काही कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांच्या जमिनीचे वाद असून, ते प्रकरण नेवासे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ताके यांच्याबरोबर असलेल्या सहकार्‍याची ओळख अजून पटलेली नाही. कुर्‍हाडीने त्यांच्यावर हल्ला झाला असून, घटनास्थळी मोटारगाडी आढळल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा नेवासे पोलिसांकडून करण्यात आला आहे. ताके यांच्या हत्येची माहिती नगरसह भिंगार शहरात वार्‍यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहीती मिळताच नगर आणि भिंगारमधील ताके यांच्या मित्रपरिवाराने नेवाशाकडे धाव घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details